बदलीच्या जागी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दणका, ७ तहसीलदारांसह ४ उपजिल्हाधिकारी निलंबित
officers Suspend : ३० पैकी १९ अधिकरी आपल्या जागेवर रुजू झाले. उर्वरीत बदली केलेले ११ अधिकारी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बदली होऊनही नव्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांवर महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये आठ तहसीलदार व चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मनासारखी बदली न मिळाल्याने नव्या ठिकाणी ठरावीक वेळेत रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. या कारवाईनंतर महसूल विभागातील बदलीचे आदेश निघालेले बहुसंख्य अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
महसूल विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंह मोहिते यांचेही निलंबन करण्यात आले आहे. निलंबित झालेल्या चार जिल्हाधिकाऱ्यांपैकी दोन जिल्हाधिकाऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाही. तर विदर्भातील सात तहसीलदारांना निलंबित केले आहे. बी. जे. गोरे (एटपल्ली, गडचिरोली), सुनंदा भोसले (नागपूर), पल्लवी तभाने (वर्धा), बालाजी सूर्यवंशी (अपर तहसीलदार,नागपूर), सरेंद्र दांडेकर (धानोरा, गडचिरोली), विनायक थविल (वडसादेसागंज, गडचिरोली), तर नाशिक विभागातील सुचित्रा पाटील (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.
महसूलमंत्र्यांनी इशारा दिला होता की, अनेक अधिकाऱ्यांनी एका जिल्ह्यात अनेक वर्ष मनमानी सेवा केली. जी मक्तेदारी अशा अधिकाऱ्यांनी निर्माण केली होती, ती आपण मोडीत काढत आहोत. अधिकाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे अन्यथा निलंबनाची कारवाई सुरू होईल. त्यानंतर ३० पैकी १९ अधिकरी आपल्या जागेवर रुजू झाले. उर्वरीत बदली केलेले ११ अधिकारी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विभाग