Nanded Police Bharti 2024 : नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय, कारण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Police Bharti 2024 : नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय, कारण काय?

Nanded Police Bharti 2024 : नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय, कारण काय?

Updated Jun 21, 2024 03:30 PM IST

Nanded Police Recruitment 2024 Process Cancelled: नांदेड पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नांदेड पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडवरून माहिती दिली.

नांदेड पोलीस भरती प्रक्रिया रद्द
नांदेड पोलीस भरती प्रक्रिया रद्द

Police Bharti 2024 : नांदेड जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदासाठी दिनांक १९ जून २०२४ पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दोन दिवसांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली.आज दिनांक २१ जून २०२४ रोजी होणारी उमेदवारांची शारीरिक चाचणी पोलीस परेड मैदानावर पाणी साचल्याने आणि पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात आलेली आहे.संबंधित उमेदवारांना पुढील तारीख त्यांच्या ईमेल आयडीवर कळविण्यात येईल, अशी माहिती नांदेड पोलिसांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली.

नांदेड पोलीस भरती अंतर्गत एकूण १३४ रिक्त पदे भरली जाणार होती. शिपाई आणि बॅन्ड्समनच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. पहिल्या दिवशी ७०५ आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी १२०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार होती. येत्या ३ जुलैपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. परंतु, पावसामुळे पोलीस परेड मैदानावर पाणी साचल्याने आणि पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

१३४ जागांसाठी १५ हजार २७५ उमेदवार मैदानात उतरणार

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, या भरती अंतर्गत शिपाईच्या एकूण १२८ पद आणि बॅन्ड्समनच्या ६ जागांवर भरती होईल. शिपाईच्या पदासाठी एकूण १४ हजार ६०६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. यात ११ हजार ३०३ पुरुष आणि ३ हजार ३०३ महिलांचा समावेश आहे. तर, बॅन्ड्समनच्या ६ जागांसाठी १ हजार ६३ जणांनी अर्ज केला आहे. असे एकूण १३४ जागांसाठी १५ हजार २७५ उमेदवारांनी अर्ज केला आहे.

उमेदवारांसाठी सूचना

मैदानी चाचणीसाठी उत्तेजक, मादक पदार्थ सेवन केल्यास अशा उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांनी भरतीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. भरती प्रक्रियेवर एसआयडी, एसीबी यासह सर्व यंत्रणाते बारीक लक्ष राहणार आहे, असाही इशारा कोकाटे यांनी उमेदवारांना दिला आहे. तसेच पोलीस भरतीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात आहे, अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असेही ते म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर