ratnagiri suicide : रक्षाबंधनाआधी भावाची आत्महत्या, बहिणीला फोन करून रेल्वेसमोर घेतली उडी, रत्नागिरीतील घटना-maharashtra ratnagiri man dies by suicide in front of train ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ratnagiri suicide : रक्षाबंधनाआधी भावाची आत्महत्या, बहिणीला फोन करून रेल्वेसमोर घेतली उडी, रत्नागिरीतील घटना

ratnagiri suicide : रक्षाबंधनाआधी भावाची आत्महत्या, बहिणीला फोन करून रेल्वेसमोर घेतली उडी, रत्नागिरीतील घटना

Aug 16, 2024 09:38 AM IST

Ratnagiri Suicide: रत्नागिरीत तरुणाने रेल्वे पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

रत्नागिरी: रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी: रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या

Ratnagiri Man Dies By Suicide: रत्नागिरी शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१५ ऑगस्ट २०२४) संध्याकाळी घडली. आत्महत्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन करून जीवनयात्रा संपवत असल्याची माहिती दिली. मात्र, या तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र राजेंद्र किर (वय, ३८) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो रत्नागिरीतील मुरुगवाडा परिसरात वास्तव्यास होता. सुरेंद्रला दारुचे व्यसन होते, अशीही माहिती मिळत आहे. गुरुवारी साडेचार वाजताच्या सुमारास सुरेंद्र कुवारबाव येथील डी मार्टच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला.तिथून त्याने आपल्या बहिणीला फोनद्वारे आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही क्षणातच पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला

या घटनेची माहिती मिळताच तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक निखारर्गे, शिवगण, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रुपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे आदी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतुदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलीसांकडून मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. संबंधित तरुणाने आत्महत्या का केली, तसेच आत्महत्येपूर्वी त्याचे बहिणीसोबत नेमके कोणत्या विषयावर बोलणे झाले, याबाबतही पोलीस माहिती गोळा करत आहे.

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

बिहारच्या भागलपूर शहरात विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१३ ऑगस्ट २०२४) घडली. या व्यक्तीची दोन मुले आणि सासू मृतावस्थेत आढळून आल्या असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत व्यक्तीने सोडलेल्या सुसाईड नोटनुसार पत्नीने आपल्या मुलांची आणि आईची हत्या केल्याचे त्याने नमूद केले आहे. याचा बदला म्हणून पतीने पत्नीची विटांनी वार करून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. मृत व्यक्तीच्या घरी दूध विक्रेते पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

विभाग