मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rains: पुणे आणि ठाणेकरांनो सावधान! पुढील चार तास धो- धो पावसाची शक्यता

Maharashtra Rains: पुणे आणि ठाणेकरांनो सावधान! पुढील चार तास धो- धो पावसाची शक्यता

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 21, 2023 09:10 PM IST

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Maharashtra Rains
Maharashtra Rains (AP)

Thane And Pune Rains Updates: महाराष्ट्रात पु्न्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालीय. चंद्रपूर, अमरावती, वर्धा याठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याच पाश्वभूमीवर पुणे आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलीय. हवामान विभागाने पुणे आणि ठाण्यात पुढील चार तास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

हवामान विभागाने नुकतीच दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि ठाण्यात पुढील चार तास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावेळी ३०-४९ किमी प्रतितास वेगाने 30-40 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात आले.

याशिवाय, हवामान विभागाने सातारा, जळगाव, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, रायगड आणि मुंबईत ३०-४९ किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 

WhatsApp channel