Maharashtra Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यातच हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज वर्तवला आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील करण्यात आले.
महाराष्ट्रात आज बहुतांशी भागात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पु्ण्यात मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई आणि ठाणेसह कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही आज पावसाच्या सरी कोसळतील.
खरीप हंगामातील पेरणीचा हंगाम जवळपास संपुष्टात आला असला तरी उत्तर प्रदेशात भात पेरणीचे उद्दिष्ट आतापर्यंत केवळ ८८ टक्के च साध्य झाले असल्याने भात उत्पादनावर यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला असला तरी ७५ पैकी ३५ जिल्हे अजूनही कमी पावसाशी झगडत असताना राज्याच्या बहुतांश भागात असमान आणि कमी पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.कृषी विभागाने नुकत्याच तयार केलेल्या अहवालानुसार राज्यात उद्दिष्टाच्या ८८ टक्के क्षेत्रावर भातलागवड झाली आहे. त्याचप्रमाणे बाजरी, मका, कडधान्ये, भुईमूग यासह सर्व खरीप पिकांची एकूण पेरणी ८४ टक्के आहे.
माजी कृषी संचालक राजेश गुप्ता म्हणाले, 'भाताची लागवड जुलै अखेरपर्यंत संपते आणि त्यानंतर कोणतेही नियोजन केल्यास हवामानातील बदलामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. अनेक जिल्ह्यांत असमान आणि कमी पावसामुळे यंदा तांदळाची उत्पादकता आणि उत्पादन दोन्ही कमी राहण्याची शक्यता आहे. भात हे असे पीक आहे जे पुरेशा पावसाशिवाय जगू शकत नाही. १५ जिल्ह्यांत पाऊस कमी, १६ जिल्ह्यांत अत्यल्प आणि चार जिल्ह्यांत अत्यल्प (सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.'
जूननंतर सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमेठी, फतेहपूर, गौतमबुद्ध नगर आणि शामली यांचा समावेश आहे. १५ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा १२० टक्क्यांहून अधिक म्हणजे अतिवृष्टी झाली असून केवळ २५ जिल्ह्यांत सरासरी पाऊस झाला आहे.