मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain: चार जिल्हे वगळता राज्यात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain: चार जिल्हे वगळता राज्यात पावसाचा यलो अलर्ट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 07, 2022 09:51 AM IST

Maharashtra Rain: परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही राज्यात सर्वत्र हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain: चार जिल्हे वगळता राज्यात पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain: चार जिल्हे वगळता राज्यात पावसाचा यलो अलर्ट (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Rain: राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असतानाच झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजही राज्यातील चार जिल्हे वगळता इतरत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्हे वगळता राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यलो अलर्ट म्हणजे हलक्या पावसाची शक्यता संबंधित भागात असते. सावध राहण्यासाठी नागरिकांना हा इशारा दिला जातो.

मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली. याशिवाय पुणे, नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागातही पाऊस झाला. विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सोयाबीनचे नकसान झाले आहे. यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. आजही हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात यंदा जूनमध्ये पावसाने उघडीप दिली होती. पण त्यानंतर दोन महिनेत मुसळधार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर राज्यात सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पाऊस पडला. काही जिल्ह्यात अतिवृष्टीही झाली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या