मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Forecast : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Weather Forecast : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 06, 2022 04:15 PM IST

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊसपडण्याचा अंदाजहवामान विभागाने वर्तवला आहे.कोकणातील जिल्हे तसेच पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्हायातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा
कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई– मागील पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे राज्यात पुन्हा आगमन झाले आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील पाच दिवस कर्नाटक किनारपट्टी, गोवा, उडिशा आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे.

मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा -

मुंबईत उद्या ७ आणि ८ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर ९ आणि १० ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी -

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर ६ आणि ७ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ८ ते १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १० ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point