Maharashtra rain live updates : पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही तालुक्यात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मुळशी, भोर, वेल्हे या तालुक्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यातील खडकवासला धरून ओसंडून वाहू लागलं असून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं असून दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.
मुसळधार पावसामुळं खडकवासला धरणातील पाणी वाढतच असल्यानं या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आता धरणातून ५० हजार क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे. त्यामुळं पुण्यातील पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्यामुळं प्रशासन सावध झालं आहे. पुण्यातील सर्व धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जोरदार पावसामुळं किरकटवाडी येथील ओढा दुथडी भरून वाहत आहे. या परिसरातील काही झाडे उन्मळून पडली असून ती लोखंडी पुलास जाऊन अडकली आहेत. यामुळं पावसाचं पाणी या झाडांवरून वाहत आहे. पाणी वाढलं तर या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी कृपया इथं तातडीची मदत पाठवून ही झाडे दूर करण्यासंदर्भात उपाययोजना करावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
> रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने घाट मार्गावरील वाहतूक ठप्प
पुण्यातील डेक्कनजवळील पुलाची वाडी परिसरात विजेच्या धक्क्यानं तिघांचा मृत्यू. बुधवारी सायंकाळी उशिरा पीडित महिला अंडी भुर्जी स्टॉल बंद करत असताना घडली घटना. मुसळधार पावसामुळं पाण्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे विजेचा धक्का बसल्याची माहिती
> पुणे आणि इतर पूरग्रस्त भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराला सतर्कतेचा इशारा देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मंत्रालयात ठाण मांडून अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
> मुंबईलाही पावसाचा जोरदार तडाखा. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच. पूर्व व पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले
> पुणे - भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली. वाहतुकीचा खोळंबा, दरड काढण्याचे काम सुरू
लोहगाव - वाघोली रोड कर्मभूमी नगर या ठिकाणी देखील पाणी साचले आहे. कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होणं कठीण झालंय.
> लवासा हिल सिटीमध्ये चिखलामुळे गाळाखाली गेलेल्या व्हिलामध्ये तीन लोक अडकल्याची भीती, पुणे आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली माहिती
> पुण्यातील खडकवासला धरण तुडुंब. सकाळपासून खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ. पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी. पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत. अनेक भागांत साचले पाणी
संबंधित बातम्या