मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune rain : जोरदार पावसाने पुण्यात एकाचा मृत्यू; कोल्हापुरात अनेक झाडे कोसळली

Pune rain : जोरदार पावसाने पुण्यात एकाचा मृत्यू; कोल्हापुरात अनेक झाडे कोसळली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 30, 2022 08:23 PM IST

परतीच्या मान्सूनने पुणे (Heavy rain in pune) व कोल्हापूरकरांची चांगलीच दैना केली आहे. जोरदार वाऱ्यासह तासभर झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

परतीच्या पावसाचा तडाखा
परतीच्या पावसाचा तडाखा

पुणे/कोल्हापूर – परतीच्या मान्सूनने पुणे (Heavy rain in pune) व कोल्हापूरकरांची चांगलीच दैना केली आहे. जोरदार वाऱ्यासह तासभर झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यात आज सुरू असलेल्या तुफान पावसामुळे येरवड्यात चालत्या रिक्षावर झाड पडून एक जणठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर (Kolhapur Rain) कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर सव्वाशे वर्षाचे वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यांना तळ्याचे रुप आले आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

कोल्हापूर शहरामध्ये आज दुपारी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पंचमी दिवशी भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडेत झाड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक खोळंबली. या महाकाय झाड कोसळल्याने कोणतीही सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल मार्गावर जोरदार वार्‍याने अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

हवामान विभागाच्या वतीने पुढील आठवडाभर पाऊसाचा अंदाज देण्यात आला आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या