मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Alert : मुंबई, पुण्यासह कोकणात कोसळधार, अनेक ठिकाणी विक्रमी पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : मुंबई, पुण्यासह कोकणात कोसळधार, अनेक ठिकाणी विक्रमी पावसाचा अंदाज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 17, 2022 10:28 PM IST

Mumbai pune konkan weather update : ठाण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुण्यातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. आहे. येत्या ३ ते ४ दिवस राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात अतिवृष्टीचा अंदाज
राज्यात अतिवृष्टीचा अंदाज

मुंबई – गेल्या दोन आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर थोडी उघडीप दिली असली तरी मुंबई, कोकण, ठाणे व पुण्यात (mumbai pune rain Alert) जोरदार बरसला आहे. ठाण्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुण्यातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. आहे. येत्या ३ ते ४ दिवस राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरे व ठाण्यात पावसाने मागील २४ तासांत जोरदार हजेरी लावली. पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पुण्यातही पावसाचा जोर वाढला असल्याने खडकवासला धरणातून विसर्ग ३० हजार क्युसेक करण्यात आला. यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला. यामुळे अद्याप पुराचा धोका नसला तरी गरज पडल्यास स्थलांतरासाठी महापालिकेच्या ३९ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असल्याने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साचलं होतं, यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच लोकल सेवेवरही परिणाम झाला होता. सायंकाळी गर्दीच्या वेळी मुंबईतील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

IPL_Entry_Point