मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

Mumbai Rain : मुंबई, नवी मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

Jul 08, 2024 11:01 PM IST

schools and colleges closed : भारतीय हवामान खात्याने मंगळवारी (९ जुलै)रोजीअतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई,नवी मुंबई,ठाणे,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई व कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर
अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई व कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain Alert : मुंबई कोकण किनारपट्टीसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी व सोमवारी दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी (९ जुलै) रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई,नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले असून कोकणात पावसाने कहर केला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या  पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. नवी मुंबईत मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने मुंबईतील सर्वच भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते व रेल्वे वाहतुकीचा पार बोजवारा उडाला आहे. भारतीय हवामान खात्याने ९ जुलै रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा९ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्यात येतील, असे आदेश पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबई, नवी मुंबई,ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा रेड अलर्ट असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यातच मुंबई आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai Rain : मालाड सबवेमध्ये पाण्यात अडकली कार, मुंबई पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले जोडप्याचे प्राण

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री व बावनदी, लांजा येथील मुचकुंदी व काजळी नदी, जापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

WhatsApp channel