मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC Exam 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

May 31, 2024 12:14 AM IST

MPSC Exam Date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ६ जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा रविवारी २१ जुलैला घेतली जाणार आहे. यासाठी ३१ मे ते ७ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

आयोगाकडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
आयोगाकडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra public service commission ) राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. ६ जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा रविवारी २१ जुलैला घेतली जाणार आहे. यासाठी ३१ मे ते ७ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या निर्णयाने EWS  प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ रविवार,  दिनांक २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून आज (३० मे  २०२४) रोजीच्या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. 

शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ६जुलै, २०२४ऐवजी २१ जुलै, २०२४रोजी घेण्यात येणार आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिराती करीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर  करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक ३१ मे, २०२४ ते दिनांक  ७ जून, २०२४  असा आहे. 

सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे, असे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग