Maha Prisons Department Pune Recruitment: Maharashtra Prisons Department Pune Recruitment 2024: महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली. या भरती अंतर्गत एकूण २५५ रिक्त पदे भरली जाणार आहे. नुकतीच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा आणि महाराष्ट्र राज्य यांनी या भरती संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरती अंतर्गत एकूण २५५ पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यात लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, रवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक आणि अशा अनेक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २१ जानेवारी २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या भरतीद्वारे लिपिक पदासाठी सर्वाधिक १२५ पदे भरली जाणार आहेत. तर, वरिष्ठ लिपिक पदासाठी ३१ पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याशिवाय, लघुलेखक निम्न श्रेणी- ०४, मिश्रक- २७, शिक्षक- १२, शिवणकाम निदेशक- १०, सुतारकाम संचालक- १०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०८ जागा आणि इतर जांगावर २८ पदे भरली जाणार आहेत.
लिपिक: १९ हजार ९०० ते ६३ हजार २००
लघुलेखक निम्न श्रेणी: ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
मिश्रक: २९ हजार २०० ते ९२ हजार ३००
उर्वरित सर्व पदांसाठी: २५ हजार ५०० ते ८१ हजार १००
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र कारागृह विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.