मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 07, 2024 03:45 PM IST

Uddhav Thackeray on Shinde Group : खोके देणारे,खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीय,उद्धव ठाकरेंसोबत अख्खा महाराष्ट्र आहे,असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Shinde Group
Uddhav Thackeray on Shinde Group

बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असा आसूड माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर ओढला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने, मनसे पदाधिकारी निलेश जंगम, उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात पुन्हा इनकमिंग जोरात सुरु झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वजण म्हणालात की, आज पुन्हा घरात आल्यासारखे वाटतंय, हेच आपल्या शिवसैनिकांचे वैशिष्ट्य आहे.शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कुठल्याच पक्षात मिळत नाही. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण आपुलकी, माया, प्रेम, जिद्द, हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही.मात्र भटकंती करून खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

तुम्ही परत आपल्या घरात आलेला आहात. लढाई मोठी आहे. पण तुम्ही एकटवलात तर लढाई सोपी आहे. न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. खोके देणारे, खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीय, उद्धव ठाकरेंसोबत अख्खा महाराष्ट्र आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

WhatsApp channel