Uddhav Thackeray Speech : नाशिकच्या राज्यव्यापी खुल्या महाधिवेशनात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदीवर जोरदार हल्लाबोल केला. सनातन धर्मावर कोणी बोलल्यास भाजपचे नेते आगपाखड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांनी हिंदू धर्मात काय योगदान दिले असा, प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही. तुमच्याकडे मित्रांचे स्थान नाही. अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. गोल्फ मैदानातील जाहीर सभेने या अधिवेशनाची सांगता झाली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. त्याचबरोबर भाजप ही भाकड आहे. त्यांच्याकडे नेते निर्माण होऊ शकत नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिराची प्रतिष्ठापणा राम नवमीला करता आली असती. त्यासाठी एवढी घाई का केली? हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय असं काही जण म्हणत आहे. यावर भाजपचे नेते मौन बाळगून आहेत. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान पण शंकराचार्यांना मान नाही. हा सनातन धर्माचा अपमान आहे.
शिवसेनेने राम मंदिर बनवण्यासाठी, ३०७ कलम हटवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात. भाजपची नीती बरोबर नाही, त्यांनी अनेक मित्रपक्षाला संपवले. त्याचबरोबर पक्षातील नेत्यांची गरज संपवल्यावर त्यांना संपवले. मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी विजय मिळवून दिला त्यांना मामा बनवले, वसुंधरा राजे, फडणीसांना बाजूला केलं. भविष्यात शिंदेना देखील फेकतील. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी सुद्धा आता सांभाळून राहिलं पाहिजे, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
राज्यात तोक्ते चक्रीवादळाने हाहाकर माजला होता. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसाने हवालदिल झाला होता. तेव्हा मोदी राज्यात आले नाहीत. त्यांनी आर्थिक मदत महाराष्ट्राला न करता गुजरातली केली. देशासाठी मन की बात व गुजरातसाठी धन की बात पंतप्रधानांची निती आहे. आता महाराष्ट्रात आठवड्याला मोदी येत आहे. मात्र मणिपूरला जात नाहीत. कारण त्यांना माहित आहे, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवावं हा महाराष्ट्रात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
संबंधित बातम्या