Thackeray group major setback in konkan : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील अपयशाने मरगळ झटकून टाकत पक्षाला नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रयत्नशील असतानाच आता उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत कोकणचा बालेकिल्ला कोसळल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचा आणखी एक बुरुज ढासळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात राजन साळवी मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी पक्षालाजय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी नाराज असून ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडू शकते.
विधानसभा निवडणुकीत आणि निवडणूकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्यानेराजन साळवी नाराज असल्याचे बोलले जात आहे.यासोबतच कुटुंबियांच्या मागे पुन्हा ACB चा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता सतावत आहे. महिनाभरात राजन साळवी पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राजन साळवी भाजपसोबत जाणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत स्पष्टता नसून याबाबत जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
कोकणचा भाग हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. पण, एकनाथ शिंदे बंडानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणात ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साळवीयांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली होती मात्रशिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला.
या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळत त्यांच्या २३५ जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीची दाणादाण उडत त्यांना पन्नाशीही गाठता आली नाही. शिवसेना ठाकरे गटालाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या