काही लोक म्हणतात मी दिवस-रात्र काम करतो. मग करा ना, काही उपकार करता का, आम्ही तुमच्या दारात आलो होतो का, तुम्हाला आमदार-खासदार व्हायचं आहे. मग करा ना काम. हा माईंडसेट बदलायला पाहिजे. कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. लवकर उठून काय उपचार करता, दूधवाला पण लवकर उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. असा सणसणीत टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेत लगावला.
पुरंदर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेता चांगलंच झोडपून काढले. काही जण म्हणतात की, मी लवकर उठून कामाला लागतो. मग काय उपकार करता का, तुम्ही कधी उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण तिला चहा करायला लागतो. पवार साहेबांनी कधी भाषणात म्हटलंय का, मी कधी उठतो, किती काम करतो? अशा शब्दात सुळे यांनी अजित पवारांविरोधात टोलेबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य केलं होते, याचा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कालचीच गोष्ट आहे, शरद पवार साहेब दुपारी ३ पर्यंत जेवण न करता अनेक कार्यक्रमात व्यस्त होते. आमच्या आमदारांना वेळत जेवण न दिल्यावर काय होते, हे माहितीच आहे. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार?कोणी कोणावर उपकार करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो.
तुम्ही दिवस-रात्र काम करता म्हणून सांगत फिरता, मात्र आम्ही यासाठी आग्रह केला होता का? आम्ही तुमच्या दारात आलो होतो का, तुम्हाला आमदार, खासदार व्हायचं आहे. कष्ट तर सगळेच करत असतात. कोणी लवकर उठतो म्हणून दररोज भाषण करत सुटतो का? अशी विचारणा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली.
मालवणमधील घटनेबाबत सुळे म्हणाल्या की, तेथे जर जयंत पाटील साहेब नसते तर परिस्थिती भीषण झाली असती. त्यांनी दोन्ही बाजुच्या लोकांना समजावून सांगत परिस्थिती हाताळली. मात्र यात दोन तासांचा अवधी गेला.
इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे मतदारसंघांमध्ये ५ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगतात. हे एकून मला धक्का बसला. एका तालुक्यासाठी इतका निधी. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही. तर ५ हजार कोटींमध्ये किती शुन्य येतील, हे येथे बसलेले बँकवालेच सांगतील.