मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धनंजय मुंडे, तटकरेंसह राष्ट्रवादीतील १२ बडे नेते भाजपात जाणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

धनंजय मुंडे, तटकरेंसह राष्ट्रवादीतील १२ बडे नेते भाजपात जाणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 11, 2024 05:25 PM IST

Maharashtra Political News : सुनील तटकरे,धनंजय मुंडेंसह अजित दादा गटातील १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतील १२ बडे नेते भाजपात जाणार, काँग्रेस नेत्याचा दावा
राष्ट्रवादीतील १२ बडे नेते भाजपात जाणार, काँग्रेस नेत्याचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटातील निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आताकाँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे,धनंजय मुंडेंसह अजित दादा गटातील १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा लोंढे यांनी केला आहे.

अतूल लोंढे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की,"धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार”, असा दावा अतुल लोंढे यांनी त्यांच्या ट्विटमधून केला आहे.

 

अतुल लोंढे यांचे ट्विट
अतुल लोंढे यांचे ट्विट

काही वेळाने अतुल लोंढे यांनीआपले पहिलेट्विट डिलीट केले आणि नंतर पुन्हा नव्याने एक ट्विट करत ही सुत्रांची माहिती असल्याचे म्हटले. नव्याने केलेल्या ट्विटमध्ये लोंढे यांनीआधीच्या ट्विटमधील नेत्यांची नावे काढून टाकली. परंतु १२ बडे नेते भाजपात जाणार या दाव्यावर ते कायम आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्येही जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महाआघाडीतील जागावाटप जवळपास अंतिम झाले असून भाजपा आणि महायुतीतील इतर पक्ष यांच्यात लोकसभेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष लोकसभेत एकत्र लढणार आहेत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. अमित शहा यांनी आपल्या मुंबईत दौऱ्यात एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे अजित पवार गटातील अनेक नेते नाराज असल्याचे दिसते.

WhatsApp channel