एक दिवस उद्धव ठाकरे रात्री २ वाजता फॅमिलीसह देश सोडून पळून जातील; शिंदेसेनेच्या नेत्याचं खळबळजनक विधान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एक दिवस उद्धव ठाकरे रात्री २ वाजता फॅमिलीसह देश सोडून पळून जातील; शिंदेसेनेच्या नेत्याचं खळबळजनक विधान

एक दिवस उद्धव ठाकरे रात्री २ वाजता फॅमिलीसह देश सोडून पळून जातील; शिंदेसेनेच्या नेत्याचं खळबळजनक विधान

Nov 28, 2024 04:42 PM IST

Uddhav Thackeray News : एक दिवस असा येईल की,उद्धव ठाकरे रात्री २वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील,असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीत न भूतो न भविष्य असे जोरदार यश मिळवून राज्याच्या सत्तेची तचावी आपल्याकडेच ठेवली आहे. महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडी पालापाचोळ्याप्रमाणे वाहून गेली. विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीपासून वेगळा होणार व मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. एक दिवस असा येईल की,उद्धव ठाकरे रात्री २वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील,,असे खळबळजनक वक्तव्य कदम यांनी केले आहे.

रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदार कदम म्हणाले की, एक दिवस असा येईल की,उद्धव ठाकरे मध्यरात्री दोन वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील,असे माझे शब्द लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली,शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला,त्यांनी जे पाप केलंय,त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागेल,अशी टीका त्यांनी केली.

रामदास कदम म्हणाले की,महायुतीला जोरदार यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी महायुतीला चांगला कौल दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत,असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

..तर महाविकास आघाडीचं मतदान २ ते ५ टक्क्यांनी वाढलं असतं -

उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं असतं तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २ ते ५ टक्क्यांनी अधिक मतदान झालं असतं, दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अती आत्मविश्वास निर्माण झाला तसेच काँग्रेसमध्ये १० जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते, असाही दावा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ३३ जागा निवडून आलो. तेव्हाही तेच मतदार होते आणि आताही तेच मतदार आहेत. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं असतं तर चार-पाच टक्के मतदान वाढलं असतं, असं दानवे म्हणाले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर