मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics: आणखी शत्रू निर्माण करून पायावर धोंडा मारून घेऊ नका, मनसेचा शिंदे गटाला सल्ला

Maharashtra Politics: आणखी शत्रू निर्माण करून पायावर धोंडा मारून घेऊ नका, मनसेचा शिंदे गटाला सल्ला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 28, 2022 05:43 PM IST

मनसे, भाजप आणि शिंदे गटामध्ये युतीची चर्चा रंगली असतानाआता शिंदे गटाकडून मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.

मनसेचा शिंदे गटाला सल्ला
मनसेचा शिंदे गटाला सल्ला

मुंबई– सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजुने झुकता कल दिल्यामुळे शिंदे गटाचा (Shinde group) आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे, भाजप आणि शिंदे गटामध्ये युतीची चर्चा रंगली असताना आता शिंदे गटाकडून मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपसोबत हातमिळवणीची चर्चा सुरू आहे. शिंदे गटासोबतही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. पण,आता मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी गंभीर आरोप केला आहे.

भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिषे दाखवली जात आहेत. वेगवेगळी पदे देण्याची ऑफर दिली जात आहे. शिंदे गटासमोर आधीच समोर एक शत्रू आहे,पण ते आणखी शत्रू का निर्माण करत आहे,त्याबद्दल कळत नाही. याबद्दल एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विनंती केली आहे, असंही नाईक यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील नेत्यांना समज द्यावी. शिंदे गटाने आणखी शत्रू निर्माण करून त्यांच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, असा सल्लाही नाईक यांनी दिला.

मनसे स्वबळावर लढणार –

तुमचा गट मोठा करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना फोडून काय साध्य करू इच्छिता?मनसे शिंदे गट एकत्र येणार नाही. मनसेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे,असंही नाईक म्हणाले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या