राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पक्ष कोणाचा व पक्षचिन्हावर कोण दावा सांगणार यावरून कायदेशीर संघर्ष सुरू आहे. यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. अजित पवार गटाकडून केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही बोगस प्रमाणपत्र जमा करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना हा दावा केला आहे. त्याचबरोबर अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही शरद पवार गटाकडून करण्यात आली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आजचा युक्तिवाद संपला असून या प्रकरणाची नियमित सुनावणी २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, पक्षावर दावा कुणाचा याची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरू असलेल्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत.
अजित पवार अजित पवार गटाच्या वतीने समाजवादी पक्षाचे खासदार कुवर प्रताप सिंग यांचे शपथ पत्र दाखल करण्यात आलं. या शपथपत्रावरती स्वाक्षरी देखील नाही आणि नोटी देखील करण्यात आलेली नाही हे कायद्याने गुन्हा आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, अजित पवार गटाने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून अनेक बनावट शपथपत्र सादर केली आहेत. हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करणार आहोत. अशी हजारो कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर ठेवले आहे. बनावट कागदपत्रांची आम्ही २४ प्रकारात वर्गवारी तयार केली असून त्यातील काही शहरात राहत नाहीत, काही विमा एजंट आहेत.
अजित पवार गटानं २६ ॲाक्टोबर रोजी एका पदाधिकाऱ्याचे प्रतिज्ञापत्र दिले. पण ते बनावट असल्याचं आम्ही सांगितलं. हे लाजिरवाणे काम असल्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देऊ नये. आम्ही फक्त ९ हजार सॅम्पल दिले आहेत. बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी मॅजिस्ट्रेट समोर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सिंघवी यांनी केली आहे.
संबंधित बातम्या