मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP Sharad Pawar : पक्ष व पक्षचिन्ह गेल्यानंतर शरद पवारांसमोर आत पर्याय काय? ‘हे’ चिन्ह व नाव मिळण्याची शक्यता

NCP Sharad Pawar : पक्ष व पक्षचिन्ह गेल्यानंतर शरद पवारांसमोर आत पर्याय काय? ‘हे’ चिन्ह व नाव मिळण्याची शक्यता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 07, 2024 01:24 PM IST

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार यांच्याकडे दोन पर्याय शिल्लक आहेत.

Maharashtra Politics
Maharashtra Politics

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठी बातमी आज समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल करत केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. पक्ष व पक्ष चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांना आता उद्या दुपारी चार वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि नवीन चिन्ह याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. त्यांनी याची माहिती न दिल्यास त्यांची नोंद अपक्ष म्हणून होऊ शकते. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार सर्वाच्च न्यायालयात जाऊ शकतात. 

निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिल्याने शरद पवार यांच्याकडे आता दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालात धाव घेऊ शकतात. दुसरा पर्याय म्हणजे शरद पवार गटाला नवं नाव आणि चिन्ह शोधावं लागणार आहे. नव्या पक्ष नोंदणीसाठी शरद पवारांना उद्या दुपारी ४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

उद्यापर्यंत शरद पवार गटाने आपले नाव व चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाला माहिती न कळवल्यास आगामी राज्यसभा निवडणुकीत त्यांना अपक्ष म्हणून मान्यता देण्यात येईल, असं त्यांना सांगण्यात आले आहे. 

शरद पवार गटाचे चिन्ह व नाव ठरले?

दरम्यान शरद पवार गटाला उगवता सूर्य हे चिन्ह तसेच ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस’, असं नाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे जाईल, हे गृहित धरून शरद पवारांनी तीन महिन्यांपूर्वीच मी राष्ट्रवादी आणि उगवता सूर्य हे चिन्ह ठरवले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाकडे शिल्ल्क असलेल्या १२० चिन्हांपैकी शरद पवार गटाने उगवता सूर्य चिन्हाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर चष्मा या चिन्हाबाबतही शरद पवार गट विचार करू शकतो. आता उद्या ते कोणते चिन्ह निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

WhatsApp channel