Man Blowing Turha : काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळ अजित पवार गटाला बहाल करत शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणून आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. शरद पवार गटाने वटवृक्ष, शिट्टी व कपबशी आदि चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला होता. मात्र आयोगाने त्यांनी मागणी न केलेले व पर्यायात नसलेले तुतारी हे चिन्हे दिले आहे.
निवडणूक आयोगाकडून 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले जाणार आहे. नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून या नवीन चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा रायगटावर होणार आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत.
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील आदेशापर्यंत या पक्षाला शरदचंद्र पवार हे नाव कायम राहणार आहे.