मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हिंगोलीत भाजपाला धक्का; किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व माजी सभापती देशमुखांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश

हिंगोलीत भाजपाला धक्का; किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व माजी सभापती देशमुखांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 21, 2024 06:18 PM IST

Maharashtra Politics : भाजपा किसान मोर्चाचे (bjp kisan morcha) राज्य उपाध्यक्ष तसेच माजी सभापती दिनकर देशमुख (dinkar Deshmukh) यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने हिंगोलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

माजी सभापती देशमुखांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश
माजी सभापती देशमुखांचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश

हिंगोलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपा किसान मोर्चाचे (bjp kisan morcha) राज्य उपाध्यक्ष तसेच माजी सभापती दिनकर देशमुख (dinkar Deshmukh) यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. वसमत येथे शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. देशमुख यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश भाजपला हिंगोली विधानसभेत मोठा धक्का मानला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची २४ एप्रिल रोजी हदगाव येथे प्रचार सभा होणार आहे. या सभेत देशमुख यांच्या असंख्य समर्थकासह भाजपा पदाधिकारिऱ्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. दिनकरराव देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या समर्थकासह शिवसेना उध्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.

देशमुख आधी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनात त्यांनी अनेक पदावर काम केले आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवसेनेत असताना शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. देशमुख हे स्वगृही परतल्याने शिवसैनिकामध्ये नवचैतन्य संचारले आहे.

कोल्हापुरात MIM चा शाहू महाराजांना पाठिंबा -

कोल्हापूर मतदारसंघातून राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

महायुतीतील नेत्यांनी संजय मंडलिक यांच्या बाजुने आपली ताकद लावली आहे तर वंचितने शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. मात्र आता शाहू महाराजांची ताकद चांगलीच वाढली आहे. कारण कोल्हापूरच्या जागेसाठी एमआयएमने काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे.

एमआयएमचे नेते व छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर मतदारसंघासाठीची आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

IPL_Entry_Point