मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाकरे व भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला ठरला होता, पण...'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

ठाकरे व भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला ठरला होता, पण...'; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 08, 2024 05:05 PM IST

Sanjay Shirsat News : २०१९साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता,असे उद्धव ठाकरे यांनी धाराशीवच्या सभेत म्हटले. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटयांनी मोठा खुलासा केला आहे.

संजय शिरसाठ यांचा उद्धव-अमित शहा भेटीवर मोठा खुलासा
संजय शिरसाठ यांचा उद्धव-अमित शहा भेटीवर मोठा खुलासा

२०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत बंद दाराआड झालेल्या ठाकरे व अमित शहांच्या चर्चेवरून जनतेत संभ्रम निर्माण झाला होता. दोन्ही बाजूने याबाबत आजही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर या गोष्टीवरून पुन्हा निशाणा साधला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता,असे त्यांनी म्हटले. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा खुलासा केला आहे.

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर म्हटलं की, अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फार्म्युला ठरला होता, तर नक्कीच ठरला होता. मात्र ज्यांच्याकडे १०५ आमदार होते, त्यांचा तो सन्मान होता. त्यामुळे आधी भाजप अडीच आणि नंतर शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेणार होतं. मात्र त्यांना उद्धव ठाकरे यांना युती करायचीच नव्हती. भाजपने मातोश्रीवर ऑफर पाठवली होती. मात्र उद्धव ठाकरेंना शिंदे विचारायला गेले तेव्हा मी बोलणी करणार नाही, तुम्हाला करायची तर करा, असे त्यांनी म्हटले. कारण तोपर्यंत पवारांनी ठाकरेंना ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचंच नव्हतं. त्यामुळे त्यांनी आधी आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्या असा हट्ट धरला. त्यानंतर भाजपने अडीच वर्षांची ऑफर मान्य करूनही उद्धव यांनी त्यांची ऑफर धुडकावली. शरद पवारांनी ५ वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याने त्यांनी निती फिरली, असा खुलासा संजय शिरसाट यांनी केला.

IPL_Entry_Point