Sanjay Raut on Eknath shinde : टी-२० विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा शुक्रवारी विधानभवनात सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय संघाला ११ कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव तू घेतलेला कॅच कोणी विसरु शकणार नाही. तसंच दोन वर्षांपूर्वी आमच्या ५० जणांच्या टीमने काढलेली विकेटही कोणी विसरु शकणार नाही, तो क्षण कोणी कधीच विसरणार नाही. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुमच्या क्लीनबोल्डची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण तुम्ही लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप उडवणार आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तुमचे तिन्ही स्टंप आता उडणार आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
शिवसेनेच्या नेत्यांवर अनेक गुन्हे राजकीय दबावातून आणि गैरसमजातून दाखल केले आहेत. यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मनस्तापामुळे वायकरांना आमच्या शिवसेनेतून पळून जायला भाग पाडले. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली.
शिंदे गटातीलखासदाररवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करत मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटले. यावरून शिवसेना टाकरे गटाचे नेतेवखासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले, आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचे बाकी ठेवले आहे. राज्यातील तसेच दिल्लीतील सरकारमध्ये ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि दंडाची बेडकी फुगवून आपली दाकद वाढल्याचे दाखवत आहेत. याच लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी-सीबीआयचे खटले दाखल करा म्हणून भाजपची लोकं ओरडत होती. त्यात रवींद्र वायकर सुद्धा होते. ते या खटल्याला घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीन चिट दिली आहे.
ज्यांचे काळीज उंदराचे आहे ते लोकं पळून गेले. राष्ट्रवादीतून अजित पवार,शिवसेनेतून मुख्यमंत्री शिंदे पळून गेले. त्यांना कारवाईची भीती होती. सोमय्यानी आता वायकरांच्या क्लीन चीटवर बोलावं असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या