मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसवर दावा सांगून 'हात' मिळवणार का? चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा खोचक टीका

काँग्रेसवर दावा सांगून 'हात' मिळवणार का? चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा खोचक टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 12, 2024 03:59 PM IST

Sanjay Raut On Ashok Chavan : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी आणि अजित पवार यांनी राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत आपलाच खरा पक्ष असल्याचे म्हणत पक्ष व पक्षचिन्हावर दावा केला. आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर हा प्रकार काँग्रेससोबतही घडेल का ? असे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

Sanjay Raut On Ashok Chavan
Sanjay Raut On Ashok Chavan

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून लवकरच तेभाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर शिवसेना ठाकरे गटाचेनेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमाणे अशोक चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय, असे खोचक ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी म्हटले की, अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते. आज गेले. एकनाथमिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? तसेच निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. तसेच आपल्या देशात काहीही घडू शकते," असेही राऊत यांनी म्हटले आहे.

 

अशोक चव्हाणांपाठोपाठ अणखी काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे.चव्हाण यांच्या पाठोपाठ पक्षातील आणखी सात ते आठ आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व आमदार चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात.

 

अशोक चव्हाण यांचा १५ फेब्रुवारीला पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. केंद्रिय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल, असेही बोलले जात आहे.तसेच चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी किंवा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel