Sanjay Raut : बावनकुळेंनी ३ तासांत ३.५ कोटी उडवले; माझ्याकडे २७ फोटो अन् ५ व्हिडिओ, संजय राउतांचा दावा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : बावनकुळेंनी ३ तासांत ३.५ कोटी उडवले; माझ्याकडे २७ फोटो अन् ५ व्हिडिओ, संजय राउतांचा दावा

Sanjay Raut : बावनकुळेंनी ३ तासांत ३.५ कोटी उडवले; माझ्याकडे २७ फोटो अन् ५ व्हिडिओ, संजय राउतांचा दावा

Nov 20, 2023 06:53 PM IST

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळतानाचे आपल्याकडे २७ फोटो व ५ व्हिडिओ आहेत. भाजपने आपले सगळे उद्योग बंद करावेत नाहीतर सर्व व्हिडिओसोशल मीडियावर शेअर करावे लागतील, असाइशारा संजय राऊतयांनी दिला आहे.

sanjay Raut
sanjay Raut

मकाऊ कॅसिनोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळतानाचे आपल्याचे २७ फोटो आणि ५ व्हिडिओआहेत.भाजपने आपले सगळे उद्योग बंद करावेत नाहीतर सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करावे लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपने दुसऱ्यांवर आरोप  करण्यापेक्षा आपल्या नेत्यांच्या कृतीचं उत्तर द्यावं, असं आव्हानही राऊतांनी दिलं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या भाजपने शेअर केलेल्या फोटोंबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा हा कथित फोटो आहे. याचा भाजपकडून बचाव करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आपल्याकडे आणखी २७ फोटो आणि ५ व्हिडिओ असल्याचाइशाराकरत संजय राऊत यांनी बावनकुळे यांना दिला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बावनकुळेंनी ३ तासांत ३.५ कोटी रुपये उडवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले की, मी केवळत्या फोटोत महाराष्ट्रातील नेता दिसतोय, असं म्हटलंय. मी कोणाचं नाव घेतलं नाही.जो व्यक्ती आहे त्यांनी ते सांगावं की तो मी नव्हेच म्हणून. किंवा पक्षाच्या लोकांनी सांगावं तसं. तेलगीने एका रात्रीत १ कोटी उडवले हे माहिती होते. मकाऊ मध्ये मात्र एक माणूस साडेतीन कोटी उडवतो म्हणजे खरेच अच्छे दिन आलेत. रेस्ट्राँरंटला जातत आणि साडे तीन कोटी उडवतात. साडे तीन कोटींचे तीन टप्प्यात कॉइन विकत घेतात. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजन घालू इच्छित नाही.

आरक्षणावरून महाराष्ट्र पेटलेला असताना, दुष्काळाची परिस्थिती असताना हे म्हणतात कुटुंबासोबत गेले होते. शेजारी बसलेले चायनीज फॅमिली आहे का? माझ्याकडे २७ फोटो आहेत आणि व्हिडीओ देखील आहेत. तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे अजून उघडे पडाल. तुमच्याकडे भारतात ईडी सीबीआय असतील, आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी सीबीआय आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

भाजपकडून पोस्ट करण्यात आलेल्या आदित्य ठाकरेंच्या वादग्रस्त फोटोंबाबत संजय राऊत म्हणाले, मी वैयक्तिक टीका करत नाही. त्या खोलीत फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम होता. मोदी बाहेरच्या देशात गेल्यावर जे पितात तेच आदित्य पीत आहेत. मोदींचा जो ब्रँड आहे तोच हा ब्रँड आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी अदित्य ठाकरे यांच्या फोटोवर केला.

Whats_app_banner