महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बऱ्याच जणांना अनपेक्षित होता. अनेक एक्झिट पोल्स व राजकीय तज्ज्ञांचा अंदाज फोल ठरवत महायुतीची जोरदार लाट पाहायला मिळाली.महायुतीने महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत करतपुन्हा सत्ता काबीज केली आहे. लाडकी बहीण योजनेसह ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा,यामुळे महायुतीचा हा ऐतिहासिक विजय साकारला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आताओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे.
मी राज्यातील ५० टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मला केवळ विधानपरिषदेची आमदारकी नको तर गृह किंवा अर्थखातं द्यावं, अशी मागणीहाके यांनी केली आहे.
खूपच अटीतटीने लढवलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार विजय साकारला आहे. महायुतीच्या झंझावातात महाविकास आघाडीचा पार सुपडासाफ झाला असून तब्बल २३६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. या विजयानंतर राज्यात राजकीय हालचाली वेगवान झाल्या असून मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेकांनी नेत्यांना गळ घातली आहे. अनेक जणांच्या दाव्य़ामुळे मुख्यमंत्रिपदाची शर्यतही अटातटीची बनली आहे.
मुख्यमंत्रीपदासह संभाव्य मंत्रिमंडळ फ़र्म्य़ुला ठरवण्यासाठी महायुतीसह दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठका सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी केल्यानं नेत्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.'नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रिपदच हवं.',अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा इतर कोणतं कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं. कारण मी राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, मनोज जरांगेंना लोक कंटाळले आहेत. त्यांनी महायुतीच्या १३० जागा पाडायची भाषा केली होती. मात्र त्यांना जेथे इशारा दिला होता, तेथील उमेदवार मोठ्या मताधिक्य़ांनी निवडून आले आहेत.
जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेंना पाडलं आहे. जरांगे लबाड माणूस आहे. राज्य़ाचा निवडणूक निकाल जरांगेंना मोठी चपराक आहे. आम्ही ओबीसीला जवळचे मानणारी माणसे आहोत तसेच महायुतीची सुपारी घेतल्याचे जरांगे जाहीरपणे बोलले होते. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा तेही म्हणत होते की जरांगेमुळे निवडून आलो. आता आम्ही हिशोब चुकता केला आहे.