मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Praniti Shinde : सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

Praniti Shinde : सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2024 09:36 AM IST

Attack On Praniti Shinde Car In Solapur: सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आहे.

सोलापुरातील सरकोली गावात गुरुवारी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला.
सोलापुरातील सरकोली गावात गुरुवारी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला.

Praniti Shinde News: सोलापुरातील सरकोली गावात अज्ञातांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकासाठी प्रणिती शिंदे या गुरुवारी सरकोली गावातील नागरिकांशी भेटीगाठी घेण्यासाठी आले असताना हा प्रकार घडला. भाजप कार्यकर्त्यांनी वाहनावर हल्ला केल्याचा प्रणिती शिंदे यांनी आरोप केला आहे. या आरोपानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापले आहे.

दिल्ली येथील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गुरुवारी (२१ मार्च २०२४) रोजी काँग्रेसची यादी जाहीर झाली. काँग्रेसकडून अधिकृतपणे प्रणिती शिंदेंचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित झाले. प्रणिती शिंदेंची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी सुरु केल्या. दरम्यान, प्रणिती गुरुवारी सरकोली गावातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात लोकांनी त्यांचे वाहन अडवून घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. हल्ला करणारे इतर कोणी नसून भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

या घटनेवर प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

"मी गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरातील नागरिकांशी संवाद साधत आहे. परंतु, गुरुवारी सरकोली गावात गेले असता काही लोकांनी माझ्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे. मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीला समर्थन आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे. परंतु, भाजपची लोक या आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे", असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

WhatsApp channel

विभाग