मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ncp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार फैसला!

Ncp Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ कुणाकडे जाणार? ‘या’ तारखेला होणार फैसला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 14, 2023 10:41 PM IST

Maharashtra politics : राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी६ ऑक्टोबर रोजी बोलावले आहे.

ncp crisis
ncp crisis

अजित पवारांच्या बंडखोरीने राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन्ही गटांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपानंतर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे.आता पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला असून त्याबाबत येत्या ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. या दिवशी अजित पवार व शरद पवार गट निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पवार गटाकडून पक्षात दोन गट असल्याच्या वृत्ताचे नेहमी खंडन केले जात असताना आता राष्ट्रवादीमध्ये दोन गटअसल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे.त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं आहे. खरा पक्ष कोणता आहे आणि त्याच्याशी संबंधित कायद्याचे महत्त्वाचे प्रश्न याबाबत ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे

यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत सांगण्यात आलं आहे.

 

राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यात अजित पवार यांनीउपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. पक्षातील शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने बोलावलं आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीत पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी६ ऑक्टोबर रोजी बोलावले आहे.

IPL_Entry_Point