मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज, शरद पवारही उपस्थित, VIDEO

उत्सव नात्यांचा.. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी साजरी केली भाऊबीज, शरद पवारही उपस्थित, VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 15, 2023 07:44 PM IST

Supriya sule : सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून काठेवाडीत जाऊन अजित पवारांच्या घरी भाऊबीज साजरी केली. यावेळी शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटूंब उपस्थित होते.

Supriya sule
Supriya sule

दिवाळीचा पाडवा व भाऊबीज पवार कुटूंबीयांसाठी विशेष असते. अजित पवारांच्या बंडखोरीने पवार कुटुंबियांच्या यंदाच्या दिवाळीकडे संपूर्ण राज्याचं लक्षलागलं होतं. पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत न गेल्यामुळे यंदा शरद पवार भाऊबीजेला काठेवाडीत जाणार का, याची उत्सुकता होती. मात्र रक्षाबंधनाला अजित पवार सुप्रिया सुळेंकडे गेले नसल्याने भाऊबीजेला त्या स्वत:अजित पवारांच्या काठेवाडीतील निवासस्थानी गेल्या व भावाला ओवाळले. अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी संपूर्ण पवार कुटूंबाने भाऊबीज साजरी केली.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार आदि अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले आहेत. शरद पवारही अजित पवारांच्या घरी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी शरद पवार भाऊबीजेसाठी जाणार का?, अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र शरद पवारांनी थेट काटेवाडीत जाऊन सर्वांसोबतच भाऊबीज साजरी केल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे देखील हजर होते.

१० दिवसापूर्वी राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला असताना अजित पवारांना डेंग्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार व दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याने ते सरकारमध्ये नाराज असल्याच्या सुरू झाल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यानिमित्त संपूर्ण पवार कुटूंबीय गोविंद बागेत असताना अजित पवार काठेवाडीत शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत होते मात्र त्यांनी गोविंद बागेत जाणे टाळले होते. मात्र रात्रीचे जेवण त्यांनी शरद पवारांसह संपूर्ण कुटूंबासोबत केल्याचे बोलले जात आहे.

भाऊबीज आटोपून अजित पवार वानखेडेवर -

शरद पवार, सुप्रिया सुळे भाऊबीजेला अजित पवारांच्या घरी गेले असताना सायंकाळच्या सुमारास अजित पवार बारामतीहून थेट मुंबईत दाखल झाले. त्यांनी वानखेडे मैदानावर जाऊन भारत न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला. गेल्या काही आठवड्यांपासून डेंग्यूमुळे राजकारणापासून लांब असलेले अजित पवार पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.

WhatsApp channel