मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 05, 2024 05:05 PM IST

Raj Thackeray : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (kirtikumar shinde) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले. हा राज ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल
मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल

Maharashtra politics : राज ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. राज ठाकरेंनी महायुतीसाठी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत जाहीर सभा घेतली आणि इकडं त्यांच्या शिलेदाराने मनसेला'जय महाराष्ट्र' करत उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केला. मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (kirtikumar shinde) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताच शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राज ठाकरेंच्या इंजिनाची साथ सोडतं, उद्धव ठाकरेंची (shiv sena uddhav Thackeray group) मशाल हातात घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. राज ठाकरेंचा हा निर्णय न पटल्याने मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला होता. यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे.

राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला तरी महायुतीच्या कोणत्याही उमेदवारासाठी सभा घेतली नव्हती. मात्र शनिवारी राज ठाकरेंनी कणकवलीत नारायण राणेंसाठी प्रचार सभा घेत त्यांच्यासाठी लोकांना मते देण्याचे आवाहन केले. शनिवारी राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली अन् इकडे त्यांच्या शिलेदाराने मोठा धक्का देत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्टही शेअर केली आहे.

किर्तीकुमार शिंदे यांची फेसबुक पोस्ट -

शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी 'मातोश्री' येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजी यांनी मला शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला.

मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आज देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे. सर्व समाजघटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शि व से ना ही चार अक्षरांची अत्यंत बळकट 'जादुई' संघटना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाह 'भामोशा' विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धवजी घेत असलेले अतुलनीय, कठोर परिश्रम यांमुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

IPL_Entry_Point