Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

Jan 17, 2025 08:31 PM IST

Sharad Pawar Ajit Pawar : आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून शिर्डीत होणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनात हातात घड्याळ बांधणार आहेत.

अजित पवार व शरद पवार
अजित पवार व शरद पवार

Sharad pawar Vs Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पहिलाच मोठा धक्का बसला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून उद्या (शनिवार) ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात य़ेत आहे.

सतीश चव्हाण विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्यासोबत आले होते. त्यावेळी आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते, मात्र आता त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.आमदार सतीश चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटाच्या शिर्डीतील अधिवेशनात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.विधानसभा निवडणुकीआधी सतिश चव्हाण शरद पवार गटात आले होते, मात्र राज्यात पुन्हा महायुती सरकार आल्याने त्यांनी पुन्हा आपला डाव बदलला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले की, सतीश चव्हाण यांनी १० ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, यामुळे त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले होते. आता त्यांनी १३ जानेवारी रोजी शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करुन पुन्हा पक्षाचे काम प्रमाणिकपणे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे आता त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाले.

 

कोण आहेत सतिश चव्हाण -

सतिश चव्हाण सन २००८ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून देखील काम पाहिले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य, सिनेट सदस्यपदी कार्य केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या