राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Election 2024)वारे वाहत आहे. येत्या १५ दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून अनेक नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीतच विधानसभेचा थेट सामना होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. काही जागांवर संघर्षाची स्थिती असल्याचे सांगितले जात असतानाच आता महायुतीत (Mahayuti) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित झालेल्यी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभेत जागावाटपाला विलंब झाल्याने महायुतीला चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीने जागावाटपात आघाडी घेत विद्यमान आमदारांचे तिकीट पक्के करत अन्य जागांवरही उमेदवार निश्चित केले आहेत.
काही जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चांनुसार भाजपच सर्वाधिक जागा लढविणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. २०१९ प्रमाणेच भाजपकडूनजवळपास १६० जागा लढविण्याचा आग्रहधरण्यात येत असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. संभाव्या उमेदवारांना तिकीट मिळू शकते त्यासंदर्भात सूचनादेण्यात आल्या आहेत.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील आहेत. पुढील आठवड्यात गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात जागावाटपाचा फॉर्ल्युला फायनल होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने १०० ते ८० जागांची मागणी केली आहे. अजित पवार गटाला विद्यमान आमदार संख्येच्या १० ते २० जागा अधिक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातनवीन सरकार २८ नोव्हेंबरआधीस्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीचे सर्व टप्पे हे १० ते २० नोव्हेंबरदरम्यान होतील. यावेळी निवडणूक जाहीर झाल्यावर लगेच उमेदवारांची नावे जाहीर करण्यावर भाजपचा भर राहणार आहे. दसऱ्याच्या आधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.