‘मातोश्री’शी निष्ठा राखलेल्या राजन साळवी यांचा अखेर राजीनामा; हाती घेणार धनुष्यबाण, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘मातोश्री’शी निष्ठा राखलेल्या राजन साळवी यांचा अखेर राजीनामा; हाती घेणार धनुष्यबाण, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

‘मातोश्री’शी निष्ठा राखलेल्या राजन साळवी यांचा अखेर राजीनामा; हाती घेणार धनुष्यबाण, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Published Feb 12, 2025 03:40 PM IST

Rajan Salvi Resigned From UBT : विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

राजन साळवींचा ठाकरे गटाला रामराम
राजन साळवींचा ठाकरे गटाला रामराम

Rajan Salvi Resigned From UBT : उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवीयांनी बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राजन साळवी उद्या (गुरुवार) दुपारी ३वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. त्यांच्या राजीनाम्याने उद्धव ठाकरेंची कोकणातील ताकद कमी होणार असून शिंदे सेनेची ताकद वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी अनेक वर्षे आमदार राहिले आहेत. लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता.

त्याचबरोबर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB)ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र,विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरुन ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरु होती.

दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का -

काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.विधानसभानिवडणुकीत हेमलता पाटील यांना उमेदवारी न देता मध्य नाशिकची जागा ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांना दिलीहोती. यामुळे पाटीलनाराज होत्या. तसेच ऐनवेळी ठाकरे गटाने एबी फॉर्म देऊनहीत्यांनी उमेदवारी ऐनवेळी माघारी घेतली होती.त्यानंतर काही दिवसातच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या