“वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? भास्कर जाधवांची बावनकुळेंवर टीका
BhaskarJadhav on bawankule : वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा,असा शब्दांत भास्कर जाधव यांनीबावनकुळे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
भास्कर जाधवांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. तुम्ही मात्र आमच्या पक्षप्रमुखांवर वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा, असा शब्दांत भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांना सुनावलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर भास्कर जाधवांनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंना यापुढे ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल. कारण, ठाकरेंनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. याला आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, मी गेल्यावेळी बावनकुळेंना वेस्ट इंडिजचा खेळाडू बोलल्यावर व्यक्तीगत टीका केली म्हणाले. मग, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का? चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. हे तुम्हाला चालते व तुम्हाला काहीतरी बोलल्यावर का ओरडता.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’ (ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट केली होती की,उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल. कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही ‘हपापले होते आणि आहात. पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.