पवारसाहेबच आमचे दैवत, आम्ही चुकलो तर...; करमाळ्यात जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार काय बोलून गेले?-maharashtra politics assembly election ajit pawar said sharad pawar is our god ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पवारसाहेबच आमचे दैवत, आम्ही चुकलो तर...; करमाळ्यात जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार काय बोलून गेले?

पवारसाहेबच आमचे दैवत, आम्ही चुकलो तर...; करमाळ्यात जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार काय बोलून गेले?

Sep 24, 2024 10:11 PM IST

Ajit Pawar on Sharad Pawar : आजवर शरद पवारांच्या सोबतच काम केलं. आता योग्य रस्त्यानं जात असून त्यात जर आमचं काही चुकलं तर आमचा कान धरा. शरद पवार हे आमचे दैवत असल्याचं विधान अजित पवारांनी केलं आहे.

शरद पवारच आमचे दैवत, अजित पवारांचे विधान
शरद पवारच आमचे दैवत, अजित पवारांचे विधान

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी आपल्या मन की बात करत शरद पवारांचे (sharad pawar ) कौतुक करत म्हटले की, आजही आमचे दैवत पवार साहेबच आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला. त्यांच्या पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला. बारामती मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यानंतर त्यांनी पक्षाच्या झेंड्यातील रंग बदलून गुलाबी केला. तसेच ते गुलाबी रंगाचे जॅकेटही परिधान करायला सुरूवात केली.

सध्या अजित पवारांची (Ajit Pawar) महायुतीत कोंडी होताना दिसत आहे. मित्र पक्षातील भाजपचे अनेक नेते आणि शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावर आणि त्यांच्या पक्षावर उघडपणे टीका करत असून त्यांना महायुतीतून बाहेर काढण्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहेत.

महायुतीत अजित पवार नकोसे झाले असतानाच अजित पवारांनी शरद पवारांबद्दलचं केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा करमाळ्यात आली होती. यावेळी शरद पवार हे आमचे दैवत आहेत. आम्ही चुकलो तर कान धरा, असं विधान अजित पवारांनी केलं आहे. आजवर शरद पवारांच्या सोबतच काम केलं. आता योग्य रस्त्यानं जात असून त्यात जर आमचं काही चुकलं तर आमचा कान धरा. आम्ही कुणाला दुखावलं नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अजित पवार म्हणाले, आजवर पवार साहेबांच्या सोबतच काम केले. पवार साहेब आमचे दैवत आहेत. पण आता आम्ही योग्य रस्त्याने जात विकास कामे करत असताना आमचे काय चुकले, असा सवालही अजित  पवारांनी करत जर आमचं काही चुकलं तर आमचं कान धरा.

 

यावेळी अजित पवार म्हणाले येत्या २९ सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. अजूनपर्यंत ज्यांना एकही रुपया मिळाला नाही, अशा महिलांना तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये येणार असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधक या योजनेवर टीका करत आहेत. ते सत्तेत असताना त्यांनी काय केले नाही आताआम्ही बहिणींना देतोय ते त्यांना पाहवत नाही. त्यामुळे विरोधकांच्या मागे जाऊ नका, असे आवाहन अजित पवारांनी महिलांना मतदारांना केले.

Whats_app_banner