Supriya sule : "सुप्रिया सुळे यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडकी बहीणचे दीड हजार देऊ"-maharashtra politics anil patil says if supriya sule income is within 2 5 lakhs we will also give her ladki bahin yojana ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya sule : "सुप्रिया सुळे यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडकी बहीणचे दीड हजार देऊ"

Supriya sule : "सुप्रिया सुळे यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडकी बहीणचे दीड हजार देऊ"

Aug 17, 2024 08:45 PM IST

ladki bahin yojana : सुप्रिया सुळे यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल. असे वक्तव्य अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana) चर्चा सुरू असून महायुतीकडून याचा जोरदार प्रकार केला जात आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या योजनेच्या प्रचार खर्चावरून सरकारवर टीका केली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी या योजनेवरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर त्यांनाही राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ देईल, त्यांनाही सरकारकडून १५०० रुपये दिले जातील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद पाडेल, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

महिलांना पैसे देऊन मते मिळवण्याचा प्रकार म्हणजे ही योजना असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे, यावरनिल पाटील म्हणाले, ही महिलांना दिलेली लाच देत नसून भाऊबीजेची ओवाळणी आहे. उद्धव ठाकरे याला लाच म्हणून महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाआघाडीचे सरकार आल्यानंतर ही योजना रद्द केली जाईल. यासाठी राज्यातला शेतकरी, युवक व महिलांनी आमचे सरकार पुन्हा आणण्याचे काम करावे.

३० नोव्हेंबर पासून आमचा ५ वर्षांचा कालावधी सुरु आहे. याचा अर्थ राज्यातील निवडणुका ३० नोव्हेंबर पर्यंत घेतल्या पाहिजेत. असंही अनिल पाटील म्हणाले.

 

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?

लाडकी बहीण योजनेवर बोलतना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं रहात नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी गल्लत केली आहे. बहिणीचं नातं दीड हजारात विकत घेता येत नाही. व्यवसायात प्रेम नसते. जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणता येत नाही.त्यांना वाटतं की, एक बहीण गेली तरी हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणू. मात्र १५०० रुपयात विकलं जाणारं नातं विकाऊ नाही. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. बहीण भावाच्या नात्याची किंमत करण्याचे पाप सरकारने केले आहे.