Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?

Dec 29, 2024 11:23 PM IST

Prajakta Mali meet Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीने कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोपवले.

प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यंमत्री फडणवीसांची भेट
प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यंमत्री फडणवीसांची भेट

Prajakta Mali Meet Devendra Fadnavis: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता वेगळ्याच वळणार जात असल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता प्राजक्ताने कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोपवले.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने रविवारी सायंकाळच्या सुमारास सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अभिनेत्रीने भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सुरेश धस यांच्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या भेटीत प्राजक्ता माळीने आपल्या तक्रारीने निवेदन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले.

आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केली.जवळपास १० मिनिटांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी सांगर बंगल्यावरून निघाली. यावेळी तिच्यासोबत तिची आई व भाऊही सोबत होता.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस –

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य सरकार खपवून घेणार नाही. संबंधितांवर कारवाई केली जाईल. अभिनेत्रीविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत असल्याची तक्रारही यावेळी केली. या सर्वांवरकारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातधनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळींवर भाष्य़ केलं होतं.जमीन व वीटभट्ट्या बळकावून प्रचंड पैसा मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जात आहे. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना परळीत आणले जाते. प्राजक्ताताईंचा जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे, असे धस म्हणाले होते.

धस यांच्या विधानानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता, परळीत पुरुष कलाकार जात नाहीत का, असा सवाल सुरेश धस यांना केला होता.त्याचबरोबर केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. यावर प्रतिक्रिया देताना प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे, अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर