Maharashtra politics : मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! नाराज असलेले १३७ कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! नाराज असलेले १३७ कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra politics : मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! नाराज असलेले १३७ कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

Published Mar 04, 2024 08:10 PM IST

Sharad Pawar Vs Ajit Pawar : मावळमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून २३७ जणांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आज सर्वांनी शरद पवारांची प्रत्यक्ष भेट घेतली.

अजित पवार गटाचे १३७ कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार गटाचे १३७ कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. अनेक मोठे नेते तिकीटासाठी पक्ष बदलत असून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून अनेक जणांनी शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. निवडणूक आयोगाने  राष्ट्रवादी पक्ष व पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर अजित पवार गटाने अनेक जिल्ह्यात सभा घेत पक्षबांधणीला सुरूवात केली. दुसरीकडे शरद पवार गट नव्याने पक्ष उभारणी करत आहे. त्यातच आता अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळमध्ये अजित पवार गटात नाराज असलेले १३७  कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.

मावळ मतदारसंघातील अजित पवार समर्थक १३७ कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. गुरुवारी (०७ मार्च) शरद पवार मावळ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात मावळ तालुक्यातील अजित पवार गटातील १३७ जण शरद पवारांच्या  राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्यात पहिल्यांच तुतारीचा आवाज घुमणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता आहे. शिरूरमध्ये अजित पवार व आढळराव पाटील यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून उमेद्वारी जवळपास निश्चित मानली जात आहे. याबाबत अजित पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. दोन दिवसीय बैठकीसाठी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आलं आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर