मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: नारायण राणेंची शरद पवारांना धमकी; संजय राऊत यांचा भाजपला खडा सवाल
Sanjay Raut - Narayan Rane - Sharad Pawar
Sanjay Raut - Narayan Rane - Sharad Pawar
24 June 2022, 10:25 ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 10:25 IST
  • Sanjay Raut on Narayan Rane Threat to Sharad Pawar: नारायण राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल वापरलेल्या धमकीच्या भाषेवरून संजय राऊत यांनी भाजपला घेरलं आहे. 

Sanjay Raut on Narayan Rane Threat: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वापरलेल्या धमकीच्या भाषेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ‘सरकार टिकेल किंवा जाईल, त्याची पर्वा नाही. पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,’ असं राऊत यांनी ठणकावलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेसह राज्यातील सरकार अडचणीत आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काल झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. बंडखोरांना महाराष्ट्रात यावंच लागणार आहे. त्यानंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल असं पवार म्हणाले होते.

पवार यांच्या याच वक्तव्याचा बाऊ करून नारायण राणे यांनी पवारांनी धमकी दिल्याचा आरोप दिला होता. हा आरोप करताना त्यांनी स्वत:च शरद पवार यांच्याविषयी धमकीची भाषा वापरली होती. बंडखोर येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असं राणे म्हणाले होते.

संजय राऊत यांनी ट्वीट करून राणेंच्या या भाषेवर आक्षेप घेतला आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसं जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.