मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Crisis : बंडखोरांना किंमत मोजावी लागेल.. यामागे भाजपचाच हात–शरद पवार
शरद पवार
शरद पवार
23 June 2022, 20:17 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 20:17 IST
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेंच्या  बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचे म्हटले.

मुंबई - शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोडीवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचे म्हटले. 

ट्रेंडिंग न्यूज

 शरद पवार म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. परंतु, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिलाय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर शरद पवार लक्ष ठेवून आहेत.

शरद पवारांनी म्हटले की, बंडखोरांना आसाममधून विधानसभेच्या प्रांगणात यावेच लागले. येथे बंडखोरांना भाजप मार्गदर्शन करू शकणार नाही.

राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) महत्त्वाची बैठक गुरूवारी झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवरील संकट टळलेलं नाही. सरकारसाठी २४ तास महत्त्वाचे आहेत, असं मोठं वक्तव्य पवारांनी केलं आहे.

या बंडामागे भाजप नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे, याबाबत प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, अजित पवारांना स्थानिक माहिती असेल, त्यांना गुजरात किंवा आसाममधील माहिती नसेल. एकनाथ शिंदेंनी व्हायरल केलेल्या व्हिडिओत स्पष्ट सांगितले आहे, की त्यांना एका राष्ट्रीय पक्षाने मदत केली. यावेळी पवारांनी पत्रकारांसमोर राष्ट्रीय पक्षांची यादी वाचून दाखवली व विचारले की, यापैकी कोणता पक्ष बंडखोरांना मदत करेल असेल तुम्हाला वाटते?

त्याचबरोबर पवार म्हणाले की, शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर शिवसेनेतून फुटणार नाहीत. ते सरकारबरोबर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.