मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बंडखोर आमदारांची किंमत ५० कोटी आहे हे खरे आहे का? राष्ट्रवादीचा सवाल
Shiv Sena Rebels
Shiv Sena Rebels (ANI)
25 June 2022, 13:14 ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
25 June 2022, 13:14 IST
  • NCP Questions Shiv Sena Rebels: एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार पैशाच्या मोहापायी गेल्याचे आरोप होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं ५० कोटींच्या आमिषाचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

NCP Questions Eknath Shinde and Shiv Sena Rebels: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार बंडखोर गटात सहभागी झाले आहेत. यामागे केवळ पक्ष नेतृत्वावरील नाराजी किंवा महाविकास आघाडी सरकारमधील घुसमट हे कारण असणं शक्य नसल्याची चर्चा पहिल्या दिवसापासून आहे. यात मोठ्या आर्थिक व्यवहाराचाही संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज जाहीरपणे ते बोलून दाखवलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बंडांचं निशाण फडकावल्यानंतर बंडखोर आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम सुरत गाठलं. तिथं एका बड्या हॉटेलात त्यांची सोय करण्यात आली होती. हा मतदारसंघ भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचा आहे. त्यामुळं या बंडामागे भाजप असल्याचं पहिल्याच दिवसापासून बोललं जात होतं. त्यानंतर बंडखोर आमदारांना खास विमानानं भाजपशासित आसाममधील गुवाहाटीत हलवण्यात आलं. तिथंही सध्या त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा थेट आरोप केला आहे.

भाजपनं हे बंड घडवून आणण्यासाठी काय केलं असावं, याचीही चर्चा आहे. त्यात ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सची भीती घालण्यापासून ते आर्थिक आमिष दाखवलं गेलं असावं, असंही बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे यांनी याच अनुषंगानं प्रश्न उपस्थित केला आहे.

'बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत ५० कोटी आहे हे खरे आहे का आणि हे पैसे कुणी दिले? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. तसंच, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची सुरत आणि गुवाहाटी येथील हॉटेलची बिलं कोण भरत आहेत?, स्पाईस जेट विमानाचं बिल कुणी भरलं? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत. संबंधित हॉटेलांमध्ये आयकर विभाग आणि ईडीनं छापे टाकल्यास काळ्या पैशाचा स्तोत्र उघडकीस येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.