मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंच्या गटाचं नाव 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट', लवकरच घोषणा

एकनाथ शिंदेंच्या गटाचं नाव 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट', लवकरच घोषणा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 25, 2022 12:50 PM IST

बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गट स्थापन करणार असून त्यांनी गटाचे नाव निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे
मंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून गट तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुरुवातीला त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला गेला. मात्र, त्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्यानं आता गट स्थापन करण्याची तयारी चालली आहे. गटाचे नावही ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली असून एकनाथ शिंदे यांच्यासह सोबत असलेल्या आमदारांच्या गटाचे नाव 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' (Shivsena Balasaheb Thackeray) असं दिलं गेल्याचं सांगण्यात येतंय. 

शिंदे गटाकडून नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असं नाव दिलं असलं तरी शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून १२ आमदारांवर कारवाईसंदर्भातील हालचालींवर दिली होती. त्याआधी बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा ट्विटर करताना म्हटलं होतं की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

IPL_Entry_Point