मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, गटनेतेपदी अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, गटनेतेपदी अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 24, 2022 01:30 PM IST

शिवसेनेकडून (Shivsena) गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी करत अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

शिवसेनेनं केलेल्या गटनेत्याच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता
शिवसेनेनं केलेल्या गटनेत्याच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्या गटाला राज्याचे विधानसभेचे उपाध्य़क्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेकडून (Shivsena) गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी करत अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला आता विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्रही झिरवाळ यांनी शिवसेनेकडे पाठवलं आहे.

शिवसेनेनं गटनेते पदावरून उचलबांगीडी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने यावर आक्षेप केला होता. तसंच एकनाथ शिंदे हेच गटनेते असल्याचा दावाही केला होता. मात्र आता शिवसेना विधमंडळ गटनेते पदी अजय चौधरी आणि प्रतोद पदी सुनिल प्रभू यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात. आता या निर्णयाविरोधात ते न्यायालयात धाव घेणार का हे पाहावं लागेल.

अजय चौधरी कोण?
शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या अजय चौधरींनी 2019 मध्ये 40 हजार मताधिक्क्याने विजय मिळवला होता. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक असून त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच पकड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे गटनेतेपद सोपवले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या