मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Revolt: शिवसेनेच्या बंडखोरांची वाट बिकट; 'ही' आहेत कारणं

Shiv Sena Revolt: शिवसेनेच्या बंडखोरांची वाट बिकट; 'ही' आहेत कारणं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 25, 2022 10:08 AM IST

Eknath Shinde Vs Shiv Sena: शिवसेनेत बंड करून अनेक आमदारांचा पाठिंबा मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांची पुढची वाटचाल खडतर असेल, असं राजकीय विश्लेषक व जाणकारांचं म्हणणं आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde (ANI)

Maharashtra Political Crisis after Revolt in Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून अर्ध्याहून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळवला असला तरी त्यांची व त्यांच्या सोबतच्या आमदारांची पुढील वाटचाल खडतर असल्याचं बोललं जात आहे. शिंदे यांना शिवसेना पक्ष ताब्यात घेता येणं जवळपास अशक्य आहे, असंच राजकीय विश्लेषक व जाणकारांचं मत आहे.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार मूळ पक्षापासून फुटताना दोन तृतीयांश लोकप्रतिनिधींची साथ नसेल तर संबंधित बंडखोर अपात्र ठरतात. याउलट तितक्या लोकांची साथ असेल तर बंडखोर गटाला अधिकृत गट म्हणून मान्यता मिळते. शिंदे यांनी ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवल्यास काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी पुढील गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.

  • कायद्यानं एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्याशिवाय आमचा गट हाच मूळ शिवसेना असा दावा त्यांना करता येत नाही. सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार फुटीर गटाला अन्य एखाद्या पक्षात विलिन होणं आवश्यक आहे.
  • बंडखोर आमदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडल्याच्या आधारावर ते मूळ पक्षावर दावा करू शकत नाहीत. त्यांना संघटनेतही उभी फूट पडल्याचं सिद्ध करावं लागेल. शिवसेनेशी संलग्न सर्व संघटना आमच्यासोबत असल्याचं दाखवावं लागेल. ते जवळपास अशक्य आहे.

वाचा: सचिन जोशी कुठे आहेत? एकनाथ शिंदेंच्या बंडाशी त्यांचं कनेक्शन काय?

  • संघटनेत फूट पाडणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शिवाय, तसं झाल्यास कोणता गट अधिक शक्तिशाली हे ठरवणं निवडणूक आयोगासाठी कठीण आहे. बंडखोर गटाला संघटनेचा पाठिंबा असल्याचं ठरवण्यात निवडणूक आयोगाला अपयश आल्यास ते केवळ आमदार व खासदारांच्या आधारे निर्णय घेऊ शकतात.
  • एकनाथ शिंदे यांचा बंड भाजपमध्ये विलीन झाल्यास 'आम्हीच खरी शिवसेना' असल्याचा त्यांचा दावाच निकाली निघतो.
  • बंडखोर आमदारांनी सामूहिक राजीनामे देऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराचा सामना करावा लागेल. अशा निवडणुकीत विजय मिळवणं हे बंडखोरांसाठी अत्यंत कठीण असेल.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या