मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: वडिलांसाठी मुलगा मैदानात; ठाण्यात श्रीकांत शिंदेंनी ताकद दाखवली!
श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे

Eknath Shinde: वडिलांसाठी मुलगा मैदानात; ठाण्यात श्रीकांत शिंदेंनी ताकद दाखवली!

25 June 2022, 18:36 ISTNinad Vijayrao Deshmukh

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक एकवटले. यावेळी शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदही रस्त्यावर उतरले. यावेळी सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Maharashtra political crisis राज्यात शिवसेनेच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या बंडखोरांच्या कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली आहे. एकीकडे बंडखोरांचा विरोध होत असतांना आज ठाण्यात वेगळे चित्र पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात ठाण्यात एकवटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत शक्तिप्रदर्शन केले. यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्रीकांत शिंदे म्हणाले, अडीच वर्ष जी अनैसर्गिक आघाडी झाली. या आघाडीमधून आपण बाहेर पडले पाहिजे. असे का वाटलें? कोणाचा तरी यामध्ये दोष असेल. कोणालातरी याचा त्रास होत असले. एकट्या एकनाथ शिंदे यांना त्रास होत असेल किंवा पाच लोकांना होत असेल. मात्र शिवसेनेच्या तब्बल ५० आमदांरा या आघाडीचा त्रास झाला. गेल्या अडीच वर्षांमध्ये या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की, आमचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्या प्रमाणे आम्हालाही चांगले दिवस येतील. मात्र, असे झाले नाहीत. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० आमदार आहेत. ही इतिहासामधली पहिली मोठी घटना असेल असेही शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, आज या प्रदर्शनात संपूर्ण ठाणेकर हे एकनाथ शिंदे यांच्या बाजुने असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानासाठी सर्व खासदारांना पाठवले होते. या अभियानांतर्गत आपली सत्ता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली की नाही, त्यांची काय परिस्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी पाठवले. मी आधी परभणीला आणि नंतर साताऱ्याला गेलो. तिथल्या आमदारांनी त्यांची वस्तूस्थिती समोर मांडली. अम्हाला निधी मिळत नसल्याची तक्रार केली. जर आम्हाला जर निधी मिळाला, तर ते थांबवण्याचं काम राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. अशा परिस्थीतीत आम्ही काय करणार होतो, असेही ते म्हणाले.