मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गद्दारांनो, मतं मागायची असतील तर स्वत:च्या बापाच्या नावानं मागा: उद्धव ठाकरे

गद्दारांनो, मतं मागायची असतील तर स्वत:च्या बापाच्या नावानं मागा: उद्धव ठाकरे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 25, 2022 04:16 PM IST

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकारीणीची बैठक बोलावत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटावर हल्ला केला.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

Maharashtra Political crisis एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना आता अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. शिंदे यांनी त्यांचा ‘शिवसेना बाळासाहेब गट) जाहिर केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकारीणीची बैठक बोलावत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटावर हल्ला केला. ठाकरे म्हणाले, स्वत:च्या बाबाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होता आता दास झाले झाले. बंडखोरांना आधी निर्णय घेऊ द्या माझ्यावर शिवसैनिकांचे सर्वाधिक प्रेम आहे, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनच्या कार्यकारीणीला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारीणीमधून हकालपटट्टी होण्याची शक्यता होती. मात्र, यावर निर्णय घेण्यात आला नाही. शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरे फार आक्रमक दिसले. शिंदे यांनी त्यांच्या गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्याचे ठरवल्यान ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष केले. ठाकरे म्हणाले, स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू. जे गद्दार आहेत त्यांना कधी पुन्हा प्रवेश मिळणार नाही असा विश्वास ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. दरम्यान, शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश दिले होते. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक यावेळी उपस्थित राहत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कार्यकारीणीत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा महत्वाचा ठराव करण्यात आला. तसेच गद्दारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या