Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला

Maharashtra politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? उदय सामंतांनी आगामी निवडणुकांचा प्लॅनच सांगितला

Jul 06, 2023 03:50 PM IST

Maharashtrapoliticalcrisis : अजित पवारांच्या प्रवेशामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसल्याचं दिसून येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Maharashtra political crisis
Maharashtra political crisis

मुंबई – अजित पवारांच्या प्रवेशामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसल्याचं दिसून येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, अशा बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. आमदारांमध्ये भांडणं झाल्याचे वृत्त चुकीचे असून मुख्यमंत्री राजीनामा देणार ही अफवा आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार हे खोटे आहे. 

उदय सामंत म्हणाले की, काही जणांकडून जाणिवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मु्ख्यमंत्री राजीनामा देतील, अशी अफवा पसरवली जात आहे, मात्र मुख्यमंत्री  राजीनामा देण्याचे वृत्त अत्यंत चुकीचे आहे. आम्ही राजीनामे देणारे नाही तर राजीनामे घेणारे आहोत. वर्षभरापूर्वी आम्ही ते दाखवून दिले आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बैठकीत ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या प्रसारमाध्यमांकडे जाणिवपूर्वक पोचवल्या जात आहेत, मात्र शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृ्त्वावर विश्वास व्यक्त केला असून पक्षात कोणतीही नाराजी नाही.

 अजित पवार मुख्यमंत्री होतील व शिंदे साहेब राजीनामा देणार हे वृत्त बिनबुडाचे आहे. हे वृत्त पसरवणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, असे उदय सामंत यांनी ठणकावले. आम्हाला महायुतीवर ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील हे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या घडल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.  एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचे ४० आमदार व १० अपक्ष आमदार राजकारणात ज्येष्ठ आहेत. दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याने मुख्यमंत्री मुंबईत परतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कालच्या बैठकीत राष्ट्रवादी सोबत जायचे नाही, असे भाषण रामदास कदम यांनी केल्याची माहिती खोडसाळ आहे, असा खुलासा सामंत यांनी केला. पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे जास्तीत जास्त मंत्री शपथ घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तिन्ही नेते तळागाळात काम करणारे आहेत. त्यांना राज्याच्या सर्व मतदारसंघाची व्यापक माहिती आहे. त्यामुळे तीन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा निर्धार सामंत यांनी व्यक्त केला

कोण किती जागा लढवणार याबाबत तीन्ही नेते एकत्रित निर्णय घेतील. राष्ट्रवादी ९० जागा लढवणार या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात. त्यांनी म्हटले म्हणून त्यांना लगेच जागा मिळाली असे होत नाही. याबाबत बैठकीत निर्णय घेतला जातो असे त्यांनी स्पष्ट केले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर